॥ ॐ चैतन्य सद्‍गुरु श्री देवेंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य सद्‍गुरु श्री देवेंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य सद्‍गुरु श्री देवेंद्रनाथाय नमः ॥ ॐ चैतन्य सद्‍गुरु श्री देवेंद्रनाथाय नमः ॥

प.पू. श्री देवेन्द्रनाथ महाराज अर्थात विजयकुमार सखाराम सुळे हे नाथपंथी सिद्धयोगी. व्यवसायांने ते निष्णात वास्तुविशारद होते.

मुम्बई च्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मधून त्यांनी वस्तुविशारद ची पदवी संपादन केली होती. प.पू. देवेन्द्रनाथ महाराज पॉंडेचरी येथील महान योगी श्री. अरविंद घोष यांचे भक्‍त श्री. मुखर्जी यांच्या संपर्कात आले. श्री. मुखर्जीबरोबर महाराजांनी आध्यात्मिक विषयवार चर्चा केली. त्यामुळे महाराज प्रभावित झाले. त्यांनी मुखर्जी यांना आपल्याला गुरूमंत्र देण्याची विनंती केली. पण मुखर्जींनी मी तुझा गुरू नसून लवकरच तूला एक महान सद्‍गुरू लाभणार आहेत व माझ्यापेक्षाही अनेक मोठमोठे चमत्कार तू स्वत:च करून दाखवशील असे सांगितले. काही दिवसांनी त्यांना आंध्र प्रदेशातील मंत्रालयम्‌ येथील समाधिस्त श्री राघवेंद्र स्वामींनी दृष्‍टांत देऊन गुरूमंत्र दिला आणि दीक्षान्त नांव देवेंद्र असे ठेवले त्यानंतर देवेन्द्रनाथ महाराज अध्यात्माकडे पूर्णपणे वळले. नाथपंथाचे पुनर्जीवन त्यांनी केले. अमूल्य असा नाथपंथी सहित्याचा ठेवा त्यांनी नाथपंथी साधक आणि शिष्यासाठी दिला आहे. नाथपंथावर संशोधन करून त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत.भस्मसमाधी साधना,हटयोग,जीवब्रम्ह सेवा, अदि साधना त्यांनी केल्या होत्या. . प्रचंड आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य त्यांनी केले. नगर जिल्यातील पाथर्डी तालुक्यात मढ़ी या गावात त्यांचे समाधी मंदिर आहे.